1) ‘महिला हॉकी आशिया चषक 2017’ स्पर्धेचे अजिंक्यपद कोणत्या देशाने जिंकले?

*उत्तर* : भारत

जपानमधील काकामिगहारा येथे खेळण्यात आलेल्या ‘महिला हॉकी आशिया चषक 2017’ स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय महिला हॉकी संघाने पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने चीनचा पराभव करत ही स्पर्धा दुसऱ्यांदा (पहिल्यांदा 2004 साली) जिंकली.

2) ‘वर्ल्ड फूड इंडिया 2017’ कार्यक्रमादरम्यान ‘ब्रॅंड इंडिया’ च्या नावाखाली कोणत्या भारतीय पाककृतीसंबंधी जागतिक विक्रम केला गेला?

*उत्तर* : खिचडी

जागतिक स्तरावर ‘ब्रॅंड इंडिया’ च्या नावाखाली ‘खिचडी’ या भारतीय पाककृतीचा प्रचार करण्याच्या दृष्टीने, नवी दिल्लीतल्या ‘वर्ल्ड फूड इंडिया 2017’ कार्यक्रमात 50 शेफच्या चमूने 918 किलोग्रॅम वजनाची ‘खिचडी’ बनविण्याचा जागतिक विक्रम केला आणि याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली गेली.

_*WhatsApp वर झटपट अपडेट राहण्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन FREE, जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_  https://goo.gl/jboswN

3) महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज उपलब्धतेसाठी वीजेसाठी राज्याच्या पहिल्या सौर कृषी फिडरचे भूमिपूजन करण्यात आले?

*उत्तर* : अहमदनगर (राळेगणसिद्धी)

5 नोव्हेंबर 2017 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथे सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे म्हणजेच पहिल्या फिडरचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सौर फीडरद्वारे आगामी तीन वर्षांमध्ये राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, सौर वीज फीडरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

4) कोणत्या भारतीय गोल्फपटूने 7 वी ‘पॅनासोनिक ओपन 2017’ ही गोल्फ स्पर्धा जिंकली?

*उत्तर* : शिव कपूर

भारतीय गोल्फपटू शिव कपूरने 7 व्या ‘पॅनासोनिक ओपन 2017’ ही गोल्फ स्पर्धा जिंकून भारतात त्याचा पहिला एशियन टूर किताब जिंकला. ही स्पर्धा दिल्ली गोल्फ क्लब येथे खेळली गेली.

5) भारतीय पेटंट कार्यालयाकडून 2017-18 या आर्थिक वर्षात कोणत्या जातीच्या आंब्याला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाले?

*उत्तर* : बनगनपल्ले आंबा

भारतीय पेटंट कार्यालयाकडून या आर्थिक वर्षात सात वस्तूंना भौगोलिक संकेत (Geographical Indication -GI) टॅग मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये आंध्रप्रदेशचे प्रसिद्ध बनगनपल्ले जातीचे आंबे, पश्चिम बंगालमधील तुलाईपानजी तांदूळ, तेलंगणाचे पोचमपल्ली इकत (कापडाचे बंडल), पश्चिम बंगालचे गोबिंदोबभोग तांदूळ, आंध्रप्रदेशचे दुर्गी दगडी कोरीव काम आणि इतीकोप्पका खेळणी,  नागालँडची चक्षेसंग शाल या अन्न/वस्तूंचा समावेश आहे.

6) 5 नोव्हेंबर 2017 रोजी ‘मराठी रंगभूमी दिन’ निमित्त कोणत्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याला ‘विष्णूदास भावे गौरव पुरस्कार‘ ने सन्मानित करण्यात आले?

*उत्तर* : मोहन जोशी

प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि जेष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना ‘विष्णूदास भावे गौरव पुरस्कार‘ ने सन्मानित करण्यात आले आहे. सांगलीतील अखिल भारतीय नाट्य विद्दामंदिर समितीतर्फे हा पुरस्कार 5 नोव्हेंबर 2017 रोजी ‘मराठी रंगभूमी दिन’ निमित्त दिला गेला.

7) कोणत्या पेमेंट बँकेने सुधांशू जैन यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली?

उत्तर : पेटीएम पेमेंट्स बँक

पेटीएम पेमेंट्स बँकेने सुधांशू जैन यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ICICI बँकेचे माजी कार्यकारी जैन यांना बँकिंग क्षेत्रात 14 वर्षांचा अनुभव आहे.

8) भारतीय रेल्वेच्या 'स्वर्ण' प्रकल्पामधील पहिली ट्रेन कोणती आहे?

*उत्तर* : दिल्ली-काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस

भारतीय रेल्वेने 6 नोव्हेंबर 2017 रोजी आपल्या पहिल्या गोल्ड स्टैंडर्ड म्हटल्या जाणाऱ्या 'स्वर्ण' ट्रेनचे अनावरण केले आहे. याचे नवी दिल्ली-काठगोदाम शताब्दी एक्सप्रेस असे नाव आहे.

_वरील माहिती आपणांस आवडल्यास किंवा फायद्याची वाटल्यास शेअर करायला विसरू नका!

Comments

Popular posts from this blog

चालु घडामोडी सराव