1) भारताने 29 ऑक्टोबर 2017 रोजी ________ कडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. विशेष म्हणजे ही खेप भारताकडून विकसित केलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या माध्यमातून पाठवण्यात येत आहे.

*उत्तर* : अफगानिस्तान

भारताने 29 ऑक्टोबर 2017 रोजी अफगानिस्तानकडे गव्हाची पहिली खेप रवाना केली. उर्वरित सहा खेपा पुढील काही महिन्यात पाठविण्यात येणार आहे.

2) कोणत्या देशातील वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या ऑक्टोबर 2017 मधील आकस्मिक निवडणूकीत पुन्हा एकदा विजय प्राप्त केला?

*उत्तर* : आइसलँड

आइसलँडचे वर्तमान पंतप्रधान बर्जनी बेनेडिक्सन यांच्या इंडिपेंडेंट पक्षाने देशात झालेल्या आकस्मिक इंडिपेंडेंट पक्षाने संसदेच्या 63 जागांपैकी 16 जागांवर विजय मिळवला

3) 30 ऑक्टोबर 2017 रोजी कुठे दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ झाला?

*उत्तर* : दुबई, संयुक्त अरब अमीराती

30 ऑक्टोबर 2017 रोजी संयुक्त अरब अमीराती (UAE) ची राजधानी दुबईमध्ये दोन दिवसीय भारत-UAE भागीदारी शिखर परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. या परिषदेत धोरणात्मक भागीदारी, गुंतवणूकीची अंमलबजावणी आणि प्रवास व पर्यटन क्षेत्रासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चेसाठी भर दिला जात आहे.

4) कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूने पॅरिसमध्ये खेळलेल्या ‘फ्रेंच ओपन सुपर सीरीज 2017’ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले?

*उत्तर* : किदाम्बी श्रीकांत

भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने पॅरिसमध्ये खेळल्या गेलेल्या ‘फ्रेंच ओपन सुपर सीरीज 2017’ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. हा चालू हंगामातील श्रीकांतचा चौथा किताब आहे.

5) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (ODI) मध्ये सर्वात कमी (194) खेळींमध्ये 9000 धावा पूर्ण करणारा फलंदाज कोण आहे?

*उत्तर* : विराट कोहली

भारत-न्यूझीलँड क्रिकेट मालिकेदरम्यान, कर्णधार विराट कोहली हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (ODI) मध्ये सर्वात कमी (194) खेळींमध्ये 9000 धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे.

6) ऑक्टोबर 2017 मध्ये _________ राज्य शासनाने विद्युत वाहनांच्या निर्मितीकरिता एका धोरणाचा आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये उत्पादकांना लाभदायक अशा सवलतींसाठी समर्थन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे.

*उत्तर* : तेलंगणा

तेलंगणा राज्य शासनाने विद्युत वाहनांच्या निर्मितीकरिता एका धोरणाचा आराखडा तयार केला आहे. या धोरणाचे तीन घटक आहेत, ते म्हणजे उत्पादक, वापरकर्ता आणि चार्जिंगसंबंधी पायाभूत सुविधा.

7) सन 2018 च्या एप्रिल महिन्यात ‘एशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) एमर्जिंग नेशन्स कप 2018’ स्पर्धा कोणत्या देशात खेळली जाणार आहे?

*उत्तर* : पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये सन 2018 च्या एप्रिल महिन्यात ‘एशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) एमर्जिंग नेशन्स कप 2018’ चे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत पाच पूर्ण सदस्य सहित सहा ACC संघ खेळतील.

8) अमेरिकेच्या _______ विद्यापीठामधील संशोधकांनी HIV ला प्रतिबंध करण्यासाठी एक प्रायोगिक लस विकसित केली आहे, जी ‘gp120’ स्ट्रेनला रोखण्यामध्ये यशस्वी ठरली.

*उत्तर* : मेरीलँड विद्यापीठ

अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठामधील संशोधकांनी HIV ला प्रतिबंध करण्यासाठी एक प्रायोगिक लस विकसित केली आहे. नव्या लसीतील प्रोटिन-शुगर (साखर) विषाणूभोवती सुरक्षात्मक कवच तयार करून मानवी प्रतिकार शक्तीला वाढवते.

Comments

Popular posts from this blog

चालु घडामोडी सराव